|
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असणाऱ्या अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने
या कार्यालयामार्फत मुद्रणालय व पुस्तके अधिनियम 1867 व त्याखालील केलेले राज्य नियम
यांची अंमलबजावणी करण्यात येते. यात प्रामुख्याने सूंपर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द होणाऱ्या
दैनिके, साप्ताहिके,अर्ध-साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, व्दैमासिके, त्रैमासिके, षण्मासिके,
वार्षिके यांची नोंदणी तसेच त्यांची नियमितता इत्यादीबाबत पाहणी करुन अभिप्राय देण्यात
येतो.वृत्तपत्रांची पडताळणी करुन त्यांना जाहिरात यादीवर घेणे, दरवाढ आणि श्रेणीवाढ
करण्याचे काम या कार्यालयामार्फत केले जाते.अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने हे कार्यालय
दि. 26 जुलै 1974 पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये विलीन करण्यात आले. अधिपरीक्षक,
पुस्तके व प्रकाशने यांच्याकडे सोपविलेली कामे पुढीलप्रमाणे :-
- महाराष्ट्रात प्रसिध्द होणाऱ्या सर्व भाषेतील नियतकालिकांची व पुस्तकांची नोंद करणे
व त्यातील आक्षेपार्ह मजकूर इंग्रजी व मराठी वृत्तसाराच्या रुपात शासनाच्या निदर्शनास
आणणे.
- वृत्तपत्रांना शासनमान्य यादीवर घेण्याबाबत पडताळणी करणे.
- नियतकालिके व पुस्तकांचे यांचे पुनर्परिक्षण करुन त्यातील उल्लेखनीय मजकूर शासनाच्या
संबंधित खात्याच्या निदर्शनास आणणे.
- वृत्तपत्र नोंदणी अधिनियमातील तरतुदींचा भंग करणाऱ्या मुद्रकांविरुध्द कारवाई करावयाची
झाल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणे.
- सार्वजनिक व वैकल्पिक सुट्टयांच्या याद्या तयार करणे.
|
|
महत्त्वाचे शासन निर्णय
|
महत्त्वाच्या वेबसाईट्स
|
|